Dainik Maval News : मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्या अध्यक्षपदी एकनाथ गाडे यांची, तर कार्याध्यक्षपदी सुभाष केदारी यांची फेर निवड करण्यात आली. यावेळी संपूर्ण कार्यकारिणीचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर, सचिव विलास साळवी व संघटक सोनबा गोपाळे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्या उपाध्यक्षपदी उत्तम शिंदे, संतोष घारे,संभाजी शिंदे, खजिनदार म्हणून विनायक बधाले, सहखजिनदार बाबाजी पाठारे, सचिव प्रवीण शिंदे, सहसचिव म्हणून महेश कुडले यांची निवड करण्यात आली.
संघटनेच्या सल्लागार मंडळामध्ये सचिन आवटे, संभाजी केदारी, दत्तात्रय गराडे, दत्तात्रय निम्हण, आणि विलास काटकर यांचीही निवड यावेळी जाहीर करण्यात आली. पोल्ट्री व्यवसायिकांच्या प्रलंबित मागण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू असे नवनिर्वाचित अध्यक्ष एकनाथ गाडे व कार्याध्यक्ष सुभाष केदारी यांनी यावेळी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पावसाळ्यात फिरायला जायचंय? पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पावसाळ्यात स्वर्गच, ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
– महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती ! २० हजार ७८७ कोटींची तरतूद ; बारा जिल्ह्यांना जोडणारा ८०२ कि.मी. लांबीचा द्रुतगती मार्ग
– मावळ लोकसभा क्षेत्रातील पनवेल विमानतळ सप्टेंबरपासून सुरू होणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
– कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान, पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्याच सल्ल्याने घेणार – आमदार सुनील शेळके