Dainik Maval News : तीर्थक्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्ष आणि 6 विश्वस्त पदासाठी सोमवारी (दि. 31) संस्थानच्या पित्ती धर्मशाळेत निवडणुक प्रक्रिया पार पडणार आहे.
श्री संत तुकाराम महाराज मंदिरातील सेवा व कारभार पाहण्यासाठी संस्थानच्या विश्वस्त व अध्यक्ष पदासाठी निवडणूक होत असते. विश्वस्तांचा कार्यकाल सहा वर्षाचा, तर अध्यक्षांचा दोन वर्षाचा कार्यकाल असल्याने विश्वस्त पदासाठी दर सहा वर्षांनी आणि अध्यक्ष पदासाठी दर दोन वर्षांनी निवडणूक होत असते.
- संस्थानचे आबाजी बुवा शाखा, गणेश बुवा शाखा आणि गोविंद बुवा शाखा असे तीन शाखा असून या प्रत्येक शाखेतून दोन-दोन विश्वस्त असे एकूण सहा विश्वस्त निवडणुकीद्वारे निवडले जातात. तर प्रतिशाखेतून दोन वर्षासाठी एक अध्यक्ष निवडला जातो. सहा वर्षांनी रविवारी नव्याने अध्यक्ष व विश्वस्त पदाची निवडणूक होणार आहे.
अबाजी बुवा शाखेतून 90, गणेश बुवा शाखेतून 141 आणि गोविंद बुवा शाखेतून 147 असे एकूण 378 मतदार मतदान करणार आहेत. अध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात 3 उमेदवार असून विश्वस्त पदाच्या 6 जागेसाठी एकूण 19 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहे.
- मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अंकुश बाळकृष्ण मोरे, सहाय्यक निवडणूक अधिकारी सुजित बाळकृष्ण मोरे आणि शामकांत एकनाथ मोरे असे तिघे कामकाज पाहणार आहेत. निवडणूक प्रक्रिया रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 दरम्यान होईल. त्यानंतर मतमोजणी होणार असून निकाल रात्री उशिरा जाहीर होणार आहे.
गोविंद बुवा शाखेतील अध्यक्ष
गोविंद बुवा शाखेतील उमेदवार अध्यक्ष पदासाठी निवडला जाणार असून अध्यक्ष पदासाठी जालिंदर मोरे, कैलास मोरे, विश्वजीत मोरे असे तीघे उमेदवार रिंगणात आहे.
विश्वस्तपदासाठी 19 उमेदवार
आबाजी बुवा शाखेतून विक्रम मोरे, भास्कर मोरे, दिलीप मोरे, जयवंत मोरे, अमोल मोरे, लक्ष्मण मोरे रिंगणामध्ये आहेत. गणेश बुवा शाखेतून विद्यमान विश्वस्त अजित मोरे, श्रीराम मोरे, उमेश मोरे, धनंजय मोरे, सचिन मोरे, गणेश मोरे तर, गोविंद बुवा शाखेतून विद्यमान विश्वस्त संजय मोरे, विक्रमसिंग मोरे, अशोक मोरे, रोहन मोरे, जयसिंग मोरे, वैभव मोरे, विवेक मोरे असे एकुण १९ उमेदवार विश्वस्त पदासाठी निवडणूक लढवीत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मिसिंग लिंक झाला, आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठ पदरी करण्याचा प्लॅन ; एमएसआरडीसीकडून सरकारला प्रस्ताव । Mumbai Pune Expressway
– शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! पुणे जिल्ह्यातील 146 किमी पाणंद रस्ते मोकळे, मावळमधील 23.8 किमी पाणंद रस्ते मोकळे
– कामाची बातमी : भूमिअभिलेख विभागाकडून गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध, असा चेक करा तुमच्या गावचा नकाशा

