व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धक्कादायक : चाकणमध्ये पोलीस व दरोडेखोरांमध्ये चकमक, डीसीपीच्या छातीवर चालवला कोयता, एपीआयच्या खांद्यावर वार

दरोडेखोरांना जेरबंद करायला गेलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिसांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 4, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Encounter between police and robbers in Chakan Pune

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : दरोडेखोरांना जेरबंद करायला गेलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिसांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बचावासाठी पोलीस उपायुक्तांनीसुद्धा गोळीबार केल्याने एक आरोपी जखमी झाला. यात चकमकीत पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड जखमी झालेत. चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचोशी गावात ही घटना घडली.

गेल्या आठवड्यात याच भागात एका घरावर या दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता, तेव्हा पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यातील दोघांना चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. मात्र याच टोळीतील आणखी दोघे काल पुन्हा चिंचोशी गावात दरोडा टाकायला येणार अशी खबर पोलिसांना मिळाली होती.

  • डीसीपी पवार यांनी एपीआय जराडसह आठ जणांचे पथक घेऊन रात्री दहा वाजता गावात पोहचले. त्यावेळी मंदिर परिसरात दोघे दबा धरुन बसल्याचे लक्षात आले. मग त्या परिसरात सापळा रचण्यात आला.

रात्री सव्वा बाराच्या सुमारास स्वतः डीसीपी आणि एपीआय दोन दरोडेखोरांच्या दिशेने निघाले, या दोघांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन करण्यात आले. मात्र दोघांनी पळून जाण्याचं धाडस स्वीकारलं, तेव्हा डीसीपी आणि एपीआय पुढं सरसावले.

दोघांपैकी एक अल्पवयीन निसटला तर दुसऱ्याने थेट कोयता बाहेर काढला. बचावासाठी डीसीपींनी बंदूक बाहेर काढली. त्यानंतर ही दरोडेखोराने डीसीपींवर कोयत्याने वार केला, डीसीपी पवार थोडं मागे हटले. मात्र वार चुकवू शकले नाहीत, त्यांच्या छातीला कोयता चाटून गेला. डीसीपी पवार रक्तबंबाळ झाले.

  • अशात त्यांनी एक गोळी झाडली, ती दरोडेखोराने चुकवली. मग एपीआय जराड दरोडेखोराला पकडण्यासाठी पुढं आले, त्याने त्यांच्यावर ही वार केला. जराड यांच्या डाव्या खांद्यावर वार झाला. मग जखमी अवस्थेत असलेल्या डीसीपींनी दुसरी गोळी थेट पायावर झाडली, यात दरोडेखोर जमिनीवर कोसळला. मग त्याला जेरबंद करण्यात आलं, दुसरीकडे पळून निघालेल्या अल्पवयीन मुलाला पथकातील इतरांनी ताब्यात घेतलं.

जवळपास वीस मिनिटं पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमकीचा थरार रंगला होता. डीसीपींना छातीवर पाच टाके पडलेत. ते थोडक्यात बचवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. जराड यांना ही मोठी इजा झालेली आहे. उपचारानंतर दोघांना डिस्चार्ज देण्यात आला. जखमी दरोडेखोरावर उपचार सुरु आहेत, तर अल्पवयीन मुलगा ताब्यात आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश 
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक


Previous Post

उर्से टोलनाक्याजवळ पकडलेले रक्तचंदन तब्बल 9 कोटींचे, दोन जण ताब्यात – वाचा संपूर्ण घटनाक्रम । Pune News

Next Post

विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्चला मतदान – वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्चला मतदान - वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.