व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, November 27, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

प्रशांत दादा भागवत युवा मंच आयोजित ‘मनोरंजन संध्या’ कार्यक्रम उत्साहात संपन्न ; जनमाणसात नव्या नेतृत्वाची सकारात्मक चर्चा

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झाले पोषक वातावरण

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 7, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Entertainment Evening program organized by Prashant Dada Bhagwat Yuva Manch concluded with enthusiasm

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : प्रशांत दादा भागवत युवा मंच आणि अमरज्योत मित्र मंडळ, भीमाशंकर कॉलनी (वार्ड क्रमांक १, वराळे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मनोरंजन संध्या” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. संपूर्ण परिसर आकर्षक प्रकाशयोजनांनी सजवण्यात आला होता. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गीत-संगीत आणि मुलांच्या कलागुणांच्या सादरीकरणामुळे वातावरण आनंदमय झाले होते.

या कार्यक्रमात अमरज्योत मित्र मंडळ तसेच महिला मंडळातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हा या संध्याकाळी विशेष ठरला. प्रशांत दादा भागवत यांच्या नेतृत्वाखालील या कार्यक्रमाने सामाजिक ऐक्य आणि एकतेचा सुंदर संदेश दिला.

आमदार सुनील शेळके यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत दादा भागवत हे सध्या मावळ तालुक्यातील चर्चेचे केंद्रबिंदू ठरले आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख सर्वत्र होत आहे. विशेष म्हणजे, गावागावांतून, विशेषतः माता-भगिनींकडून त्यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या कार्याची दखल घेणारा ठरत आहे. त्यांच्या समाजाभिमुख कामामुळे युवक, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदर व विश्वास वाढत आहे.

प्रशांत भागवत यांनी समाजकार्यातून निर्माण केलेली लोकसंपर्काची साखळी आता राजकीय पातळीवरही दृढ होताना दिसते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृती उपक्रम राबवले जात असून, त्यातून मावळात एक सकारात्मक आणि परिवर्तनशील वातावरण तयार झाले आहे.

या कार्यक्रमात बोलताना प्रशांत दादा भागवत म्हणाले की, “राजकारण हे सेवेसाठी असते, सत्तेसाठी नव्हे. जनतेच्या विश्वासाची कदर करून समाजाच्या सर्व घटकांसाठी काम करणे हेच आमचे ध्येय आहे. युवक आणि महिलांचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे.” त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

मनोरंजन संध्येसारख्या उपक्रमांमुळे सामाजिक एकता, संस्कृतीचे संवर्धन आणि जनतेशी थेट संवाद साधण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे मावळ तालुक्यात प्रशांत दादा भागवत यांच्या नेतृत्वाभोवती नव्या राजकीय उर्जेची आणि परिवर्तनाची लाट उसळताना दिसत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी
– पुणे जिल्हा परिषद आणि 13 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार यादी बुधवारी प्रसिद्ध होणार
– लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव मावळ, देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर – पाहा एका क्लिकवर


dainik maval jahirat

Previous Post

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठातील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता – मंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

लोणावळा नगरपरिषद निवडणूक 2025 : अंतिम प्रभाग रचना आणि नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर । Lonavala Municipal Election

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lonavala-Municipal-Council

लोणावळा नगरपरिषद निवडणूक 2025 : अंतिम प्रभाग रचना आणि नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर । Lonavala Municipal Election

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Burglary accused open fire on police Thrilling chase at Somatane Phata Maval accused arrested

मोठी बातमी ! घरफोडीतील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार ; सोमाटणे फाटा येथे पाठलाग सुरू असतानाचा थरार, आरोपी जेरबंद

November 27, 2025
Karla-Khadkala Zilla Parishad Group Maval Citizens prefer Ashatai Waikar candidature

कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांच्या उमेदवारीला नागरिकांची पसंती

November 27, 2025
Kusgaon Kale Zilla Parishad group Maval Dattatray alias Bhausaheb Gund in election fray

कुसगांव – काले जिल्हा परिषद गट : दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड निवडणुकीच्या रिंगणात

November 27, 2025
Vadgaon Nagar Panchayat Election 2025 Mrunal Mhalaskar campaign tour is full of enthusiasm

वडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 : मृणाल म्हाळसकर यांचा प्रचार दौरा उत्साहात । Vadgaon Maval

November 27, 2025
Vadgaon Nagar Panchayat Election 2025 Mrunal Mhalaskar campaign has increased

वडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 : मृणाल म्हाळसकर यांच्या प्रचाराचा वेग वाढला । Vadgaon Maval

November 27, 2025
sunil-shelke-ajit-pawar-new

Lonavala Election : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लोणावळ्यात घेतलेल्या ‘त्या’ एका निर्णयाचे राज्यभर होतंय कौतुक, विरोधकांनीही मानलं…

November 26, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.