अनेक संत महात्मे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली झालेली भूमी म्हणजे मावळ प्रांत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेच्या इतिहासातही मोलाचा वाटा आणि मानाचे स्थान लाभलेला प्रांत म्हणेज मावळ. या मावळ ( Maval News ) प्रांताचे जे बारा भाग होते. त्यापैकी सध्या अस्तित्वात असलेला प्रमुख भाग म्हणजे मावळ तालुका. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
वैभवशाली सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या मावळ तालुक्यात ( Maval Taluka ) अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत, जी जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत असतात. यात अनेक किल्ले, लेणी, मंदीरे, धरणे यांचा समावेश होतो. आज महाशिवरात्री ( Mahashivratri) आहे. या निमित्ताने आपण मावळ तालुक्यातील काही प्रमुख आणि प्राचीन शिव मंदिरे ( Lord Shankar Temple ) यांबाबत जाणून घेणार आहोत. प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी पाहावीत अशी सुंदर शिवमंदिरे मावळ तालुक्यात आहेत. ( Famous Lord Shiva Shankar Temple In Maval Taluka Kondeshwar Sangameshwar Ghoradeshwar Wagheshwar Ghoradeshwar Ghateshwar Godhaneshwar )
- श्री क्षेत्र वाघेश्वर –
मावळ तालुक्यातील पवनमावळ भागात मौजे शिळींब गावाजवळ असलेले श्री क्षेत्र वाघेश्वर येथील शिवशंकराचे प्राचीन मंदिर भाविकांनी नेहमीच आकर्षित करते. पवनाधरणाच्या पाण्याच्या जलाशयात असलेले हे मंदिर पाणी ओसरताच भाविकांसाठी खुले होते. तोपर्यंत धरणाकाठी असलेले शिवमंदिर भाविकांसाठी दर्शनाला खुले असते.
- श्री क्षेत्र कोंडेश्वर –
मावळ तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या जांभवली या गावात भगवान शंकराची स्वयंभू पिंड आहे. परिसरातील नागरिकांसाठी हे मंदिर अराध्य आहे. नुकतीच येथे भगवान शंकराची अखंड मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा कऱण्यात आली आहे. महाशिवरात्री, प्राणप्रतिष्ठापणा दिवस या दिवशी इथे शिवभक्तांची मोठे गर्दी होत असते.
- श्री क्षेत्र संगमेश्वर –
वाडिवळे गावाच्या हद्दीत असलेले श्री क्षेत्र संगमेश्वर हे शिवशंकराचे एक प्राचीन मंदिर आहे. येथील शिवमंदिरात भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी दूर दूर हून भाविक येत असतात. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरत असते.
- श्री क्षेत्र घोराडेश्वर –
मावळ तालुक्यातील प्रसिद्ध शिवमंदिरांच्या यादीत श्री क्षेत्र घोराडेश्वर येथील शिवमंदिराचा प्रामुख्याने समावेश होतो. पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे शहराजवळ असलेल्या टेकडीवर भगवान शंकराचे हे मंदिर असून महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव असतो. तसेच अनेक ठिकाणांहून शिवभक्त येथे येत असतात.
- श्री क्षेत्र घाटेश्वर –
वडेश्वर गावातील शिंदेवाडी येथे असणारे श्री क्षेत्र घाटेश्वर हे शिवशंकराचे प्राचीन आणि अत्यंत सुंदर असे मंदिर आहे. निर्सगाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर पर्यटक आणि भाविक यांना नेहमीच आकर्षित करते.
- श्री क्षेत्र गोधनेश्वर –
लोणावळा जवळ राजमाची किल्ल्याच्या पायथ्याला उधेवाडी गावाजवळ श्री क्षेत्र गोधनेश्वर हे एक प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर आहे. तलावाकाठी असलेले हे प्राचिन शिवमंदिर भाविक आणि पर्यटक यांना नेहमीच आकर्षित करते.
या प्रमुख शिवमंदिरांसह मावळ तालुक्यातील प्रत्येक गावात आपल्याला किमान एक तरी सुंदर शिवमंदिर असलेले दिसून येते.
अधिक वाचा –
– महाशिवरात्रीच्या दिवशीच घरातील देव्हाऱ्याजवळ नागाचे दर्शन, वन्यजीव रक्षकच्या सर्पमित्रांमुळे अनर्थ टळला – पाहा व्हिडिओ
– पुणे ग्रामीण भागात हॉटेल्स, रेस्टॉरंट, बिअर बार आदी ठिकाणी कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी, नियम तोडल्यास कारवाई होणार
– ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन, ‘इथे’ करा संपर्क