Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी लेखक ओंकार वर्तले, प्रा. अंकुश गुंड, गणेश लोंढे, विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे आणि पर्यवेक्षिका रेखा भेगडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत गीताद्वारे केले. तसेच, नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या ताई-दादांना शुभेच्छा देत त्यांना परीक्षेसाठी प्रेरणा दिली.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील गोड आठवणींना उजाळा देत शिक्षक आणि व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार मानले. या वेळी, वर्गशिक्षक रजनी बधाले, आशा आवटे आणि विजय मुळे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी मौल्यवान मार्गदर्शन केले आणि निकाल शंभर टक्के येईल, असा आत्मविश्वास व्यक्त केला.
माजी विद्यार्थी गणेश लोंढे यांनी शाळेबद्दलचा आत्मीय संबंध व्यक्त करत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. ओंकार वर्तले यांनी शाळेच्या आठवणी सांगत शिक्षकांचे आयुष्यातील महत्त्व अधोरेखित केले. तसेच, प्रा. अंकुश गुंड यांनी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करता येते, असा संदेश दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंग पोटे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि मेहनतीचा मंत्र दिला.
विद्यार्थ्यांनी शाळेला माईक साउंड सिस्टीम, डायस आणि विद्येची देवी सरस्वतीची मूर्ती भेट दिली, तर नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षार्थींना पेन आणि गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली पाटील, धनश्री भोकरे आणि समृद्धी शेजूळ यांनी केले. संजय खराडे, राम कदमबांडे आणि नाजुका सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा समारंभ यशस्वीपणे पार पडला. शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सरकारची लाडक्या बहिणींवरील माया आटली ! ‘या’ महिलांची नावे वगळणार, दरवर्षी करावी लागणार ई-केवायसी । Ladki Bahin Yojana
– वडगावकरांचा लाडका शिवम, दीक्षा समारंभानंतर बनले ‘महक ऋषी’ ; दीक्षा समारंभासाठी भक्तीचा महापूर । Maval News
– खळबळजनक ! गावच्या यात्रेत झालेल्या वादातून चार जणांचा एकावर प्राणघातक हल्ला, मावळ तालुक्यातील घटना । Maval Crime