Dainik Maval News : शासनाचा प्रस्तावित तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला असून या मार्गामुळे बाधित होणाऱ्या क्षेत्रातील जमीन संपादनाला ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीमुळे रेल्वे मार्ग प्रकल्प रद्द करण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे करण्यात आली आहे.
कुरुळी (ता. खेड) येथील ग्रामस्थांनी मंत्री आठवले यांची भेट घेतली. याप्रसंगी या भागातील जनतेवर अन्याय होऊ देणार नसल्याची ग्वाही मंत्री रामदास आठवले यांनी दिली. हा प्रस्तावित रेल्वे मार्ग तळेगाव ते सांगुर्डी, तळवडे, निघोजे मार्गे कुरुळी व उरुळी कांचन येथे जातो. या सर्व गावांमधील शेतकरी या मार्गामुळे बाधित होणार असून, त्यांच्या जमिनी, घरे, वडिलोपार्जित व्यवसाय आणि पर्यावरण यावर गंभीर परिणाम होणार आहे.
मंत्री आठवले यांनी स्थानिकांचा भावना रेल्वे प्रशासनाच्या पुणे विभागाच्या अधिकार्यांना तत्काळ फोन व पत्राद्वारे कळविल्या आहेत. तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्गाला मावळ सह खेड तालुक्यातील स्थानिकांचा तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रचंड विरोध असताना असा प्रकल्प करणे संयुक्तिक होणार नाही. त्यामुळे शासनाने या रेल्वे प्रकल्पाबाबत पुर्नविचार करावा, अशी मागणी स्थानिक नेते मंडळी करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! नगरपरिषदा, नगरपंचायतींची प्रारूप मतदारयादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार
– अखेर बिगुल वाजले ! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत
– देवस्थानच्या शेतजमिनी हडप करणाऱ्यांचा खेळ खल्लास ! सरकारचा मोठा निर्णय