केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज (बुधवार, दि 1 फेब्रुवारी) रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 संसदेत सादर केला. यावेळी अर्थमंत्री सितारमन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या काळातील हे नववे बडेट आहे तर निर्मला सितारमन यांनी सलग पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर केला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आदिवासी समुदायांसाठी पीएम पीव्हीटीजी योजनेची घोषणा
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी यंदाचा अर्थसंकल्प सात घटकांवर म्हणजेच सप्तर्षीवर आधारित असेल असे सांगितले. यावेळी त्यांनी सप्तर्षीमधील क्रमांक एक आणि क्रमांक दोन म्हणजेच सर्वसमावेशक विकास आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास करणे या अंतर्गत देशातील आदिवासी समुदायांसाठी मोठी घोषणा केली. यात नव्या योजनेची घोषणा केली. प्रधानमंत्री पीव्हीटीजी ( PVTG ) म्हणजेच आदिम आणि असुरक्षित आदिवासी गट ( Primitive and Vulnerable Tribal Groups योजना ) यांकरिता या योजनेची घोषणा केली. याअंतर्गत सुरक्षित घरं, स्वच्छ पाणी, टेलेकॉम आणि रस्ते सोयीसुविधा आदी गोष्टी पुरवणे आदी उद्देश असणार आहेत. तसेच, अनुसूचित जमातींच्या विकास कार्यक्रमासाठी पुढच्या तीन वर्षात 15 हजार कोटींची तरतूद देखील बजेटमध्ये करण्यात आली.
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांची सुरुवातीला महत्वाची माहिती….
अर्थसंकल्प सादर करताना सुरुवातीलाच, भारताच्या “अमृतकाळातलं” पहिलं अर्थसंकल्पीय भाषण असल्याचे सांगताना भारताच्या 100व्या वर्षाच्या वाटचालीकडे नेणारा हा अर्थसंकल्प असेल असे निर्मला सितारमन म्हणाल्या. तसेच, सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देताना, PM आवास योजना, किसान सम्मान निधी, कोरोना लसीकरण आदींची माहिती सभागृहाला दिली. ग्रामीण महिलांचं सशक्तीकरण, हस्तकलेच्या कलाकारांना बळ, पर्यटनाला प्रोत्साहन आणि ग्रीन ग्रोथ या चार गोष्टी अमृत काळात पुढे जाताना महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रातील मोदी सरकारचा हा निवडणूकपूर्वीचा अर्थसंकल्प असल्याने सर्वांचेच या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून राहिले होते. आज (बुधवार) सकाळी राष्ट्रपती दौपती मुर्मू यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाला औपचारिक मंजूरी दिली. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतही अर्थसंकल्पाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी संसदेत हा अर्थसंकल्प सादर केला. यंदाही सितारमन यांनी डिजीटल पद्धतीने अर्थसंकल्प सादर केला.
अधिक वाचा –
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : करदात्यांसाठी मोठी खुशखबर, 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त राहणार
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : भारतीय रेल्वेसाठी तब्बल 2.4 लाख कोटींचा निधी ते देशात 50 नवीन विमानतळे उभारणार
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : महिला वर्ग आणि शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारच्या अनेक मोठ्या घोषणा, लगेच वाचा…