मावळ तालुक्यातील चांदखेडमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गावच्या यात्रेदरम्यान गावगुंडाने दारूच्या नशेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सदर गावगुंडाला अटक केली असून आरोपीसह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. ( Firing In Air During Yatra At Chandkhed Village Maval Crime Pune )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदखेड येथे यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात लोकं जमा झाली होती. यावेळी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अविनाश गोठे या गावगुंडाने हवेत गोळीबार केला. हा प्रकार सीसीटीव्हीसह अनेकांच्या मोबाईलमध्ये कैद झाला. पोलिसांना या प्रकरणाची खबर लागताच त्यांनी तपास करत गोठेसह अन्य तिघांना ताब्यात घेतले. यावेळी चौकशीदरम्यान अविनाश गोठे या गावगुंडावर अजूनही काही गुन्ह्यांचा संबंध असल्याचे दिसून आले.
शिरगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ आणि सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांनी पथकासह ही कारवाई केली. पुढील तपास शिरगाव पोलिस करत आहेत.
अधिक वाचा –
– ऑनस्क्रीन आजीबाई हरपल्या! ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे दुःखद निधन, उतारकाळातील संघर्ष तुम्हालाही रडवेल
– सेवा रस्त्याच्या दुरावस्थेबाबत वडगाव शहर भाजपा आक्रमक, एमएसआरडीसीला निवेदन देत दिला आंदोलनाचा इशारा