महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोमवारी ( 1 मे ) तळेगाव दाभाडे येथील ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ चे उदघाटन माजी राज्यमंत्री आणि मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऑनलाईन प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. ( First Hinduhriday Samrat Balasaheb Thakre Aapla Dawakhana in Maval taluka started in Talegaon dabhade )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याचा विचार करून प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. आता वाढत्या शहरीकरणाचा व विस्तारित शहरांचा विचार करता गोरगरीब रुग्णांना सामान्य आजारांसाठी तात्काळ आरोग्य तपासणी व उपचाराची सुविधा मिळणे ही मोठी गरज निर्माण झाली आहे. या दृष्टीकोनातून ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु करण्यात येत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने पहिल्या टप्प्यात दोनशे दवाखान्यांना मान्यता दिली होती. कोरोना काळात यातील फारच थोडे दवाखाने प्रत्यक्षात सुरू होऊ शकले. मात्र मुख्यमंत्री बनल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेला युद्धपातळीवर गती देण्याचा निर्णय घेतला आहे.
मावळ विधानसभा मतदार संघातील तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथे पहिल्या 'आपला दवाखाना ' चा शुभारंभ मा. मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणाली द्वारे पार पडले…सदर कार्यक्रमाला प्रमुख उदघाटक म्हणून उपस्थित होतो.@BJP4Maharashtra pic.twitter.com/RGfPWaRSbs
— Bala Bhegade- बाळा भेगडे (@BalaBhegade) May 1, 2023
मावळ विधानसभा मतदार संघातील तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथे पहिल्या ‘आपला दवाखाना ‘ चा शुभारंभ सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणाली द्वारे पार पडला. यावेळी प्रत्यक्ष बाळा भेगडे यांनी फीत कापून दवाखान्याचे उद्घाटन केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन.के.पाटील, तालुका आरोग्यधिकारी डॉ. लोहारे, ऍड. रवीनाना दाभाडे, मा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, मा नगरसेवक अरुण भेगडे, शोभा भेगडे, सचिन टकले, रजनी ठाकूर, शोभा परदेशी आदी उपस्थित होते. ( First Hinduhriday Samrat Balasaheb Thakre Aapla Dawakhana in Maval taluka started in Talegaon dabhade inaugurated by Bala Bhegade and CM Eknath Shinde )
अधिक वाचा –
– वडगावात ‘मल्हार’ कुटुंबीयांकडून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा । Maharashtra Din 2023
– ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ । पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून 3 मे रोजी किल्ले लोहगड इथे स्वच्छता अभियान