Dainik Maval News : मावळ तालुक्यातील श्रद्धास्थान असलेल्या पाच तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे. या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी एकूण ५ कोटी २ लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. क वर्ग तीर्थस्थळ दर्जा दिल्याबद्दल आणि मंदिर परिसर विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार सुनील शेळके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे मावळच्या जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.
‘क’ वर्ग तीर्थस्थळांचा दर्जा मिळालेली तीर्थस्थळे
श्री कोंडेश्वर देवस्थान, जांभवली
श्री फिरंगाई माता मंदिर, नाणोली तर्फे चाकण
श्री चौराई माता मंदिर, सोमाटणे
श्री संगमेश्वर देवस्थान, वडिवळे
श्री वाघजाई माता मंदिर, खंडाळा
लवकरच तीर्थस्थळ विकासासाठी उपलब्ध झालेल्या निधीतून विकास कामांना सुरुवात केली जाणार असल्याचे आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले.