तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेशभाई लालचंद शहा यांचे निधन झाले आहे. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी माननीय जिल्हा संघचालक, विविध संघटनांचे आधारवड म्हणून सुरेशभाई शहा यांनी काम पाहिले. त्यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ( Former Mayor of Talegaon Dabhade Municipal Council Sureshbhai Shah passed away )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तळेगाव नगरीचे नगराध्यक्ष म्हणून सुरेशभाई शहा यांनी अनेक विधायक कामे केली होती. अगदी उतारवयापर्यंत ते समाजकार्यात कार्यरत होते. रविवारी त्यांचे निधन झाले असून आज (सोमवार, 12 डिसेंबर) रोजी त्यांच्यावर तळेगाव दाभाडे येथे अंतिमसंस्कार होणार आहेत.
अधिक वाचा –
– भीषण अपघात! मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर विद्यार्थ्यांची बस पलटली, अनेकजण जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु
– तैलबैल येथे क्लाईम्बिंग करताना खाली पडून ट्रेकर्सचा मृत्यू, शिवदुर्गच्या जवानांनी शोधला मृतदेह