Dainik Maval News : मावळ विधानसभेच्या माजी आमदार, मावळच्या पहिल्या महिला आमदार राहिलेल्या रुपलेखा खंडेराव ढोरे यांचे आज (दि. २८ ) अल्प आजाराने दुःखद निधन झाले आहे. सन १९९५ ते १९९९ या युती सरकारच्या काळात रुपलेखा ढोरे या मावळ विधानसभेच्या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.
बुधवारी (दि. २८) दुपारी १२ च्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल संपूर्ण मावळ तालुक्यातून विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे. त्यांची अंत्ययात्रा आज (दि. २८ ) वाजता वडगाव मावळ येथील त्यांच्या राहत्या घरापासून सायंकाळी ५ वाजता निघेल. तसेच वडगावमधील वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येईल, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
