Dainik Maval News : वडगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या संचालकपदी नारायण ढोरे, गोरख ढोरे, मनोज गवारे आणि चंद्रकांत खांदवे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सोसायटीचे संचालक सुभाष जाधव, किसन भेगडे, ॲड अजित वहिले आणि चंद्रकांत ढोरे यांनी सर्वपक्षीय कार्ड कमिटीच्या निर्णयानुसार कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामे दिले होते. त्यामुळे रिक्त संचालक पदासाठी वडगाव मावळ येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात निवडणूक अधिकारी एम.ए. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विहित मुदतेत नारायण ढोरे, गोरख ढोरे, मनोज गवारे आणि चंद्रकांत खांदवे यांचे अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. याप्रसंगी सोसायटीचे चेअरमन किसन वहिले, व्हाईस चेअरमन गणेश भालेकर, सर्व संचालक मंडळ आणि भास्करराव म्हाळसकर, गुलाबराव म्हाळसकर आदी मान्यवर उपस्थित होते. निवड प्रक्रियेचे कार्यालयीन कामकाज सचिव विजयराव कालेकर यांनी पाहिले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मिसिंग लिंक झाला, आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठ पदरी करण्याचा प्लॅन ; एमएसआरडीसीकडून सरकारला प्रस्ताव । Mumbai Pune Expressway
– शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! पुणे जिल्ह्यातील 146 किमी पाणंद रस्ते मोकळे, मावळमधील 23.8 किमी पाणंद रस्ते मोकळे
– कामाची बातमी : भूमिअभिलेख विभागाकडून गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध, असा चेक करा तुमच्या गावचा नकाशा
