मावळ तालुक्यातील वारंगवाडी येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची सुटका करण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे. नितीन वारिंगे आणि त्यांचे सहकारी राजाराम तुमकर यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना संपर्क करून कळवले होती की, वारंगवाडी येथील संगमेश्वर मंदिराजवळील विहिरीत एक कोल्हा पडला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कदाचित दोन तीन दिवस झाले असावे, तो कोल्हा विहिरीत पडलेला असावा. ही माहिती मिळताच वन्यजीव रक्षकचे निलेश गराडे हे त्यांचे सहकारी भास्कर माळी, शुभम काकडे, गणेश सोंडेकर, जिगर सोळंकी, प्रशांत भालेराव आणि रेस्कू टीम घेऊ तिथे पोहोचले. तसेच वन विभागालाही याची माहिती देण्यात आली. जाळीच्या सहाय्याने कोल्ह्याची सुटका करण्यात आली. ( Fox rescued at Warangwadi Maval )
वन परिक्षेत्र वनाधिकारी हनुमंत जाधव यांना याबाबत अपडेट्स देण्यात आले. कोल्ह्याची प्राथमिक तपासणी केली असता, तो जखमी झाला नव्हता. परंतू जंगलात सोडण्यासाठी कमकुवत होता. त्यामुळे हनुमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वन आधिकारी एमएस हिरेमठ यांच्या सोबत कोल्ह्याला पुढील उपचारासाठी रेस्कु चॅरिटेबल ट्रस्ट पुणे येथे पाठवण्यात आले.
अधिक वाचा –
– नायगावमधील युवकाचा कामशेत येथे इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू, परिसरात पसरली शोककळा । Maval News
– पुणे जिल्ह्यातील 3 लोकसभा मतदारसंघात सोमवारी शांततेत मतदान ! वाचा विधानसभा निहाय मतदानाची आकडेवारी । Pune News
– आदर्शवत ! थेट लंडनवरून येऊन तरुण मतदाराने मावळ लोकसभा मतदारसंघात केले मतदान । Maval Lok Sabha