Dainik Maval News : ट्रेडिंगच्या बहाण्याने गुंतवणूक करण्यास सांगत एका व्यक्तीची २५ लाख ७६ हजार १५० रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २१ मे २०२४ ते २३ डिसेंबर २०२४ या कालावधीत किवळे येथे घडली.
फसवणूक झालेल्या व्यक्तीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हिमांशू मनराल, मोतीलाल ओसवाल प्रा वेल्थ ऍप कंपनीचा मॅनेजर आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल असे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादी यांना गुंतवणूक करण्यास सांगून त्यांच्याकडून २५ लाख ७६ हजार १५० रुपये घेत त्यांची फसवणूक केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– चालकाचे प्रसंगावधान, दुचाकीस्वारांची मदत अन् पोलिसांची सतर्कता ; देहूरोड येथे पेटलेल्या ट्रकचा सिनेस्टाईल थरार । Dehu Road News
– दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज ‘आपले सरकार’ प्रणालीद्वारे 10 मार्च पर्यंत स्वीकारले जाणार
– सेवा रस्त्यालगतच्या व्यवसायिकांच्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा ; रस्त्यात वाहने उभी केली जात असल्याने नागरिक त्रस्त