Dainik Maval News : पवनानगर येथील पवना विद्या मंदिर येथे पाच किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरुन विविध गावातून पायी चालत शाळेत येणाऱ्या 15 गरीब व गरजू मुलींना रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या मोफत सायकल वितरित करण्यात आल्या.
यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे शालेय समितीचे अध्यक्ष संतोष खांडगे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष मिलिंद शेलार,सचिव राजेंद्र पंडित, डायरेक्टर डॉ. अशोक दाते,अजय पाटील, पवना शिक्षण संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे सर व शिक्षकवृंदासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना संतोष खांडगे म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना वेळ जाऊ नये त्यासाठी अनेक सेवाभावी संस्था विद्यार्थ्यांना मदत करत असतात या सुविधेचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी भारताचा एक जबाबदार नागरिक होऊन वंचितांच्या सेवेसाठी तयार राहण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष मिलिंद शेलार म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जास्तीत जास्त वेळ भेटत नाही कारण त्यांना पायपीट करून शाळेत यावे लागते त्यासाठी सायकल वाटप करण्यात आले आहे.
दिनांक 26 जानेवारी रोजी अजून 50 सायकली रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी केले सुत्रसंचलन वैशाली कोयते व भारत काळे यांनी केले तर आभार महादेव ढाकणे यांनी मानले..
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वंदन दुर्गांना । “योगसाधनेतून घडली आंतरराष्ट्रीय योगप्रशिक्षक” : मनाली देव यांचा प्रेरणादायी ‘जीवनयोग’ । International Yoga Instructor Manali Dev
– कार्ला गडावरील एकविरादेवीच्या नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण ; अजित पवारांच्या हस्ते शुक्रवारी विकासकामांचे भूमिपूजन । Karla News
– मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या पुन्हा रुजू होण्याला लोणावळा जागरुक नागरिक मंचचा विरोध !