Dainik Maval News : शिरगाव येथील आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालयातील 54 विद्यार्थ्यांना आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सायकली वाटप करण्यात आल्या. यामुळे ग्रामीण भागातून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार आहे.
विजय गोपाळे यांनी आमदार शेळके यांनी विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप केल्याबद्दल आभार व्यक्त करत विद्यार्थ्यांसाठी खरोखर महत्वाची भेट असल्याचे मत व्यक्त केले. मोहन अरगडे यांनी आमदारांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत आभार व्यक्त केले.
शिरगाव येथील आश्रमशाळेच्या प्रांगणात झालेल्या सायकल वाटप कार्यक्रमाला साई संस्थांचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवळे, सचिव सपना लालचंदानी, सरपंच पल्लवी गोपाळे, माजी उपसरपंच विजय गोपाळे, स्वप्नील अरगडे, ग्रामपंचायत सदस्य श्रीधर गोपाळे, विशाल गोपाळे, नवनाथ गोपाळे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष मोहन अरगडे यांसह इतर मान्यवर, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
कार्यक्रमास माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक रमेश फरताडे, शारदाश्रमचे मुख्याध्यापक विजय लोखंडे, बद्रीनारायण पाटील, मच्छिंद्र कापरे आदींचे सहकार्य लाभले. आभार डॉ. हनुमान सुरनर यांनी मानले..
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील 40 गावांमध्ये दुर्गामाता दौड । Maval News
– शिरगाव येथे अवैध दारूअड्ड्यावर कारवाई, महिला आरोपीवर गुन्हा दाखल । Maval Crime
– वंदन दुर्गांना । पतीच्या निधनानं ती कोसळली, मात्र संगीताने जगण्याचं बळ दिलं ; गायन हाच श्वास समजून आयुष्य जगणाऱ्या मंजुश्रीताई