Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महिलांसाठी मोफत फॅशन डिझाइनिंग प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे. यात सुमारे ४५ महिला सहभागी झाल्या आहेत. मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण शहरातील महिलांकरीता सुरू करण्यात आले आहे.
यामध्ये महिलांना बेसिक शिवणकाम तसेच डिझायनर ड्रेस शिवणे आदीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर अधिकारी कल्याणी लाडे, विभा वाणी, महिला बालकल्याण विभागाच्या प्रमुख अर्चना काळे व इतर अधिकारी उपस्थित होते.
ओम ग्रामनेय इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशन एक्सलन्सचे प्रमुख शिवराम चव्हाण, प्रशिक्षिका मयुरी घोडके, प्रकल्प प्रमुख शेखर मोरे व महिला प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठा निर्णय : राज्यात सर्व चारचाकी वाहन धारकांना एक एप्रिलपासून फास्ट टॅग अनिवार्य
– महाराष्ट्र शासनाच्या कामकाजातील निर्णय प्रक्रीया सुलभ व गतीमान होणार ; प्रशासकीय कारभार बनणार अधिक पारदर्शक
– नवं सरकार, नवं धोरण : ‘ईज ऑफ लिव्हिंग’साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सात कलमी कृती कार्यक्रम