Dainik Maval News : वारु व ब्राम्हणोली गावातील ग्रामस्थांसाठी तसेच विशेषतः महिलांसाठी शनिवारी (दि.21) मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात आरोग्य तपासणीसाठी 70 महिला व 37 पुरुषांनी सहभाग घेतला. युवती व महिलांसाठी मासिकपाळी तसेच कॅन्सर संदर्भात विशेष आरोग्य तपासणी करण्यात आली.
डोळे तपासणीसाठी एकूण 94 महिला व पुरुष सहभागी झाले होते. तर, मागील 9 डिसेंबर रोजी झालेल्या जेष्ठ नागरिकांच्या शिबिरातील 3 महिला व 4 पुरुष अशी एकूण 7 जणांची मोतीबिंदूचे ऑपरेशन एच. व्ही. देसाई हॉस्पिटल मध्ये यशस्वीरित्या झाले आहेत. सर्वांना गरजेनुसार औषध गोळ्या देण्यात आल्या व आवश्यकते नुसार चष्मे देण्यात आले.
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया गोरान ग्रॉसकोफ फॅमिली क्लिनिक व एच.व्ही. देसाई हॉस्पिटल यांच्या टीमने सर्व रुग्णांच्या आरोग्य तपासणीचे काम पार पाडले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
– तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News
– महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर ! प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार