लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना सन 2023-24 अंतर्गत वडगाव नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांसाठी सुमारे 2 कोटी 45 लक्ष निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून वडगाव शहरातील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, विद्युत वाहिनी भुमिगत करणे ही कामे करण्यात येणार आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
वडगाव शहरात खालील भागात कामे होणार –
1. प्रभाग क्र. 7 अंतर्गत लघु विद्युत वाहिनी भुमीगत करणे – 86 लक्ष 71 हजार
2. प्रभाग क्र. 14 अंतर्गत विद्युत वाहिनी भुमीगत करणे – 81 लक्ष 39 हजार
3. वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. 14 मधील विशाल ठोंबरे घरापासून ते NH-4 हायवे पर्यंत ओढ्याला संरक्षण भिंत बांधणे – 46 लक्ष 90 हजार
4. वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. 14 मधील NH-4 ते देवराम पारीठे सर यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता करणे – 2 लक्ष 62 हजार
5. वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. 14 मधील शिवराज हॉटेल ते वारुळे यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा पेव्हर ब्लॉक बसविणे – 2 लक्ष 82 हजार
6. वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. 7 मधील मिलींदनगर चौक ते NH-4 पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा पेव्हर ब्लॉक बसविणे – 12 लक्ष 14 हजार
7. वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. 7 अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे – 12 लक्ष 42 हजार
या वरील विकासकामांसाठी हा एकूण 2 कोटी 45 लाखांचा निधी आमदार सुनिल शेळके यांनी उपलब्ध करून दिल्याचे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी सांगितले. ( Fund For Vadgaon Nagar Panchayat Under Lokshahir Annabhau Sathe Nagari Vasti Sudhar Yojna )
अधिक वाचा –
– श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेची चमकदार कामगिरी, ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक
– लोणावळ्यात शरद पवारांची तोफ धडाडणार! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा गुरुवारी कार्यकर्ता संवाद मेळावा
– हुश्श..! पुण्यात प्रशासनाला ‘कात्रजचा घाट’ दाखवून पळालेल्या बिबट्याला पकडण्यात यश, रात्री सव्वा नऊ वाजता मोहिम फत्ते । Pune Katraj Park Leopard Update