जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा मानवी जीवनासाठी किती अनमोल आहे. याचे महत्त्व विशद करून अभंग गाथा चिंतन या सत्रातून आपण नेमका काय बोध घेऊन जायचा आहे, याचे अतिशय साध्या सोप्या शब्दात संत साहित्याचे अभ्यासक, वारकरी दर्पणचे संपादक आदरणीय सचिनदादा पवार यांनी विवेचन केले. यानंतर अभंग गाथेतील अभंगाचे अतिशय सुंदर निरूपण दादांनी आपल्या अभ्यासपूर्ण प्रासादिक वाणीतून केले. ( Gatha Chintan Session At Shri Kshetra Dehu By Abhang Pratishthan )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी सायंकाळी ठीक सहा ते सात या वेळेत हे गाथा चिंतन सत्र होणार आहे. पुढील सत्रात सहभागी होण्यासाठी प्रथम नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
सत्र दुसरे : रविवार, दि.५ फेब्रुवारी,२०२३ सायं.ठीक ६ वाजता. (या सत्रात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही)
नाव नोंदणीसाठी संपर्क : ९८८११३५२५१/ ९८८१६१९०८६/९८२२२८६३५३/९८८११८३५५५
अधिक वाचा –
– राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त कामशेतच्या महर्षी कर्वे शाळेत लाठी-काठी प्रशिक्षण शिबिर
– आधी दुचाकीला धडक, नंतर दुचाकीस्वार महिलेसोबत गैरवर्तन; मुजोर रिक्षाचालकाला तळेगाव पोलिसांकडून अटक