Dainik Maval News : तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बधलवाडी येथे एका युवकाकडून गावठी पिस्टल जप्त करण्यात आले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या डीबी पथकाने रविवारी (दि.27) ही कारवाई केली.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला बदलवाडी हद्दीत एक व्यक्ती संशयास्पद रित्या फिरताना दिसून आला. पोलिसांनी त्या व्यक्तीला हटकले आणि थांबविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो व्यक्ती पळून जावू लागला.
त्यामुळे पोलिसांनी चपळतेने त्याला पकडले आणि त्याची अंगझडती घेतली. तेव्हा त्याच्या कंबरेला एक गावठी पिस्टल आणि 2 जीवंत काडतूसे मिळून आली. त्याची चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव कुणाल गणपत जगताप (वय 23) असून तो वडगाव मावळ येथील रहिवासी असल्याचे त्यांने सांगितले.
त्याच्या विरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम 37(1) (3) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार व्ही. एम. शेख. करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आई – बाबा मतदान करा… मावळ विधानसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांकडून आई-बाबांना मतदानाचे आवाहन
– देवेंद्र फडणवीसांचा आदेश डावलला, बाळा भेगडे यांचा बापू भेगडेंना पाठींबा कायम, महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार नाही !
– मोठी घडामोड ! भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून रविंद्र भेगडे यांनीही भरला उमेदवारी अर्ज । Maval Vidhan Sabha