सिनेक्रॉन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड ( Synechron Technologies Private Limited ) यांच्या सीएसआर फंडातून मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना 140 संगणक संच भेट देण्यात आले. ( Gift Of 140 Sets Of Computer To Zilla Parishad Primary Schools In Maval Taluka )
“ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे,हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून सिनेक्रॉन कंपनीने सामाजिक बांधिलकी जोपासत हा उपक्रम माझ्या मावळातील शाळांमध्ये राबवला. त्याबद्दल कंपनीचे व सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आजचे युग आधुनिक तंत्रज्ञानाचे आहे. याकडे वाटचाल करीत असताना जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांना देखील शालेय स्तरावरच संगणकीय ज्ञान मिळाले पाहिजे. डिजिटल शाळा व मुलांना संगणकाची आवड निर्माण व्हावी, या सर्व बाबींचा विचार करून शाळेमध्ये संगणक असणे गरजेचे आहे. त्यामुळे शाळेला संगणक मिळावा अशी अनेक दिवसांपासून मागणी होत होती. आता शाळेत संगणक उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे”, असे मत यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर कार्यक्रमाला आमदार शेळकेंसह सिनेक्रॉन टेक्नॉलॉजीसचे असोसिएट डायरेक्टर रफिक नदाफ, कायदेशीर सल्लागार सैफन मुजावर, सीनियर डायरेक्टर उमेश भापकर, ॲडमिन मॅनेजर राजेश आगळे, राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, वडगाव नगरपंचायत नगराध्यक्ष मयूर ढोरे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, युवक तालुकाध्यक्ष किशोर सातकर, संजय गांधी समिती अध्यक्ष नारायणराव ठाकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा दिपाली गराडे, चांदखेड माजी सरपंच जिजा आगळे, ग्रामीण ब्लॉक महिला अध्यक्षा पुष्पा घोजगे, साते सरपंच आरती आगळमे, उपसरपंच आम्रपाली मोरे, डॉ. विकास कुडे, नितीन जाधव, रशिदा नदाफ, मुकुंद तनपुरे तसेच मावळ तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, शिक्षक, विद्यार्थी व पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ग्रामपंचायत निवडणूक 2022 : मावळ तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींच्या 83 जागांसाठी 225 उमेदवारी अर्ज, सरपंच पदासाठी 51 अर्ज
– खुशखबर! पर्यटन विभागाकडून 3 दिवस मोफत सहल; आगाखान पॅलेस ते तळेगावमधील बाबासाहेबांचे निवासस्थान आदींचा समावेश