Dainik Maval News : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे मावळ तालुक्यातील लोणावळा ( कुरवंडे, ता. मावळ ) जवळील लायन्स व टायगर पॉईंट येथील ग्लास स्काय वॉक प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये ग्लास स्काय वॉक प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.
अजित पवार यांच्या माध्यमातून नियोजन विभागाकडून ५ फेब्रुवारी २०२४ रोजी या प्रकल्पासाठी ३३३ कोटींची मान्यता दिली आहे. या बैठकीत प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भात प्राथमिक समन्वय, प्रस्तावित सुविधा, जागेची आवश्यकता, स्कायवॉकचे महत्त्व, अॅडव्हेंचर व अम्युझमेंट पार्क, पर्यटकांची सुरक्षा व निवास याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रकल्पामधील प्रस्तावित अंतर्भुत सुविधा :
1. भव्य प्रवेशद्वार, तिकीट घर, फूड कोर्ट, स्नॅक बार, वाहनतळ, कनिष्ठ समारंभ हॉल यांसारख्या सोयी. सायटसीईंग, झिप लाईन, बंजीजंपिंग, वॉल क्लायम्बिंग, फेरीस व्हील यांसारखे साहसी खेळ.
2. झुला, रेन डान्स, स्केटिंग, पाण्याची टाकी, CCTV कॅमेरे, ध्वनीप्रणाली, प्रकाशयोजना इत्यादी सुविधाचा समावेश आहे.
बैठकीत घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय :
1. जागेची आवश्यकता : उपलब्ध जागेची कमतरता लक्षात घेऊन वनविभागाने अधिकची जागा उपलब्ध करून द्यावी.
2. स्कायवॉकचे महत्त्व : स्थानिकांना स्कायवॉकचा अनुभव यावा यासाठी दरमहा ध्वजवंदन सोहळा आयोजित करण्यात येईल.
3. अॅडव्हेंचर व अम्युझमेंट पार्क सोबत आणखी नावीन्यपूर्ण गोष्टींचा समावेश करून पर्यटन सुविधा वाढवण्याबाबत दिले निर्देश
4. पर्यटकांची सुरक्षा व निवास: पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेवर भर. निवासासाठी टेंटिंग सुविधा उभारण्याचा निर्णय
5. मावळ तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.
सदर बैठकीस आमदार सुनील शेळके यांच्या समवेत राजेश देशमुख (उपमुख्यमंत्री यांचे सचिव), रमेश जालनापुर (माजी अध्यक्ष – रामोजी फिल्म सिटी), जितेंद्र डूडी (जिल्हाधिकारी – पुणे V.C. वर), योगेश म्हसे (आयुक्त – PMRDA – V.C. वर), मंगेश वानखेडे (मु. का. अ. गार्डियन मीडिया) तसेच मावळ तालुक्यातील गणेश ढोरे, विठ्ठल शिंदे, साहेबराव कारके, दिपक हुलावळे आदी मान्यवर उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगाव मावळ न्यायालयासाठी मंजूर १०९ कोटी निधीतून भव्य इमारत उभारण्याचा निर्णय ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थित बैठक संपन्न
– गाडीची पीयूसी सोबत नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही? पाहा काय आहे सरकारचे नवीन धोरण । No PUC No Fuel Initiative
– शेतकऱ्यांनो.. तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता वितरित
