Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ठरविले आहे. सर्व मालमत्ता धारकांनी थकीत व चालू कर तात्काळ भरावेत, असे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे.
मालमत्ता कर हा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी महत्वपूर्ण असून याचा रस्ते, शिक्षण, स्वच्छता इत्यादी सार्वजनिक सेवांसाठी उपयोगी होतो. तसेच तो चांगल्या प्रकारे वसूल झाला तर शासनाकडून संस्थेला भरीव निधी उपलब्ध होतो. यासाठी सर्व मालमत्ता धारकांनी थकीत व चालू कर तत्काळ भरावा. तसेच चतुर्थ कर आकारणी प्रक्रिया स्थगित असल्याने जुन्या दरानेच मालमत्ता धारकांनी कराचा भरणा करावा, अशीही सूचना देण्यात आली आहे.
मालमत्ता धारकांना कराच्या देयकाचे वाटप प्रभाग निहाय करण्यासाठी वसुली लिपीकांना विशेष आदेश जारी करण्यात आला आहे. वेळेवर कर भरल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही. तसेच ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने कर भरता येईल, अशी माहिती वरिष्ठ अधीक्षक कर संकलन विभाग, कल्याणी लाडे यांनी दिली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आई-वडिलांच्या भांडणाला घाबरून चिमुकलीने घर सोडले ; वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगी पुन्हा सुखरूप परतली । Talegaon News
– रब्बी हंगामातील पिकांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाची मोहीम, थेट शेताच्या बांधावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
– घराच्या बांधकामावरून लाकडी दांडक्याने जबर मारहाण ; मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime