मावळ तालुका ( Maval Taluka ) हा डोंगर-दऱ्यांचा तालुका म्हणून ओळखळा. सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगरांची एक माळ मावळ तालुक्यातून जाते. हा उंचावरील भाग घाटमाथा म्हणूनही परिचित आहे. याच भागात शिवकालीन अनेक किल्ल्यांचा ठेवा आहे. यासह अनेक प्राचीन मंदिरेही या भागात आहेत. अशाच प्रदेशात लपलेलं, निसर्ग सौंदर्य लाभलेलं आणि ऐतिहासिक वारसा असलेलं गोधनेश्वर मंदिर ( Godhaneshwar Temple ) याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ( Godhaneshwar Temple In Maval Taluka )
राजमाची ( Rajmachi Fort ) किल्ल्याच्या पायथ्याला उधेवाडी गावातून एक दगडी पायवाट आपल्याला एक प्राचीन हेमाडपंथी मंदिराकडे आणि तलावाकडे घेऊन जाते. या तलावाकाठी प्राचिन असे एक शिवमंदिर आहे, ज्याचे नाव आहे गोधनेश्वर मंदिर. हे मंदिर साधारण 700 ते 800 वर्ष जुने असावे, असे सांगितले जाते.
गोधनेश्वर मंदिर नेमके कुणी आणि कधी उभारले याबद्दल निश्चित माहिती प्राप्त झालेली नाही. परंतू येथील स्थानिक लोक हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माच्या ( इ.स. 1630 ) आधीपासून येथे असल्याचे सांगत आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या मंदिराबद्दल बोलायचे झाल्यास निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर अत्यंत सुंदर आहे. मंदिराचा संभामंडप रेखीव दगडी खांबावर उभा आहे. मंदिराच्या गाभाऱ्यासमोर दगडी नंदी आहे. मंदिरासमोरील गोमुखातून बारमाही पाणी वाहत असते. आसनस्थ नंदी, दीपमाळ, गणपतीची मूर्ती या आजही मंदिराच्या प्राचीनतेची साक्ष देतात. ( Godhaneshwar Temple In Maval Taluka Near Rajmachi Fort Information )
अधिक वाचा –
लोणावळा गणेश विसर्जन मिरवणूक : गणेशभक्तांसोबत आमदार शेळकेंनी धरला ठेका, जल्लोषाचा Video व्हायरल
‘त्यामुळे इतिहासात प्रथमच तळेगाव नगरपरिषदेत स्वातंत्र्यदिन साजरा झाला नाही’, किशोर आवारेंची रोखठोक पोस्ट