Dainik Maval News : भारतीय रेल्वेने यावर्षीच्या गणेश उत्सवाच्या काळात भाविकांसाठी आणि प्रवाशांसाठी सुसह्य आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी ३८० गणपती विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्यात येत आहे. महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशातील प्रवासांची मोठी मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या २९६, पश्चिम रेल्वेच्या ५६, कोंकण रेल्वेच्या ६ तर दक्षिण रेल्वेच्या २२ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
गणपती विशेष रेल्वे सेवा
गणेशोत्सव २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान साजरा होणार असून, ११ ऑगस्टपासून गणपती विशेष रेल्वे सेवा सुरू झाल्या आहेत. या विशेष रेल्वे सेवांचा विस्तार कोकण रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर झाला आहे. या विशेष रेल्वेगाड्यांचे थांबे वाढविले आहेत.
यामध्ये कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, पुणे, मुंबई, ठाणे, पनवेल, कर्जत, लोणावळा, खान्देश्वर, रत्नागिरी, सावंतवाडी, थिवीम, करमाळी, मडगाव, काणकोण, गोवा, वास्को, सांगली, मिरज, कुडाळ, सिंधुदुर्ग, राजापूर, नांदगाव, वलवई, वेंगुर्ला, मालवण, देवगड, निपाणी, सावर्डे, कोलाद, तारकर्ली, मालगुंड, आचरा, वेंगुर्ला रोड, सावर्डे रोड, कणकवली रोड, कुडाळ रोड, सिंधुदुर्ग रोड, राजापूर रोड, निपाणी रोड आदी ठिकाणांचा समावेश आहे.
या रेल्वे सेवांबाबत अधिक माहिती आयआरसीटीसी वेबसाईट, रेल्वे वन ॲप आणि संगणकीकृत पीआरएस वर उपलब्ध आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारणीस मंत्रिमंडळ समितीची मान्यता
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध ; हरकती व सूचनांसाठी ३१ तारखेपर्यंत मुदत । Talegaon Dabhade
– पुणेकरांना वाहतूककोंडीतून अल्प दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथील एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे लोकार्पण