राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूकांचा धुरळा उडाला आहे. सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर पासून ऑनलाईन नामनिर्देशनपत्र भरण्याची आणि जमा करण्याची सुरुवात झाली आहे. मात्र ऑनलाईन नामनिर्देशनपत्र भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढताना अडचण येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने शेवटच्या तीन दिवसांसाठी उमेदवारी अर्ज जमा करण्याची वेळ स. 11 पासून पुढे दुपारी 3 ऐवजी पुढे दुपारी 5.30 पर्यंत वाढवली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काय आहे निवडणूक आयोगाची सुचना?
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 243 के आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतींच्या मुदत संपण्यापूर्वी निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्याची संपूर्ण जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे;
राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 03/10/2023 रोजी राज्यातील 2359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम देण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानुसार संगणक प्रणालीद्वारे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असून दिनांक 16/10/2023 ते दिनांक 20/10/2023 या कालावधीत नामनिर्देशनपत्र सादर करण्यात येणार आहेत. त्यानुसार दिनांक 16/10/2023 पासून संगणकप्रणालीव्दारे नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरु झाली आहे.
नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र (अफेडेव्हिट) संगणकप्रणालीव्दारे भरले जात आहे. मात्र त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त होत आहेत. सदर तांत्रिक अडचण maha online कडून दूर करण्यात आली आहे. सबब दिनांक 18/10/2023 ते दिनांक 20/10/2023 या कालावधीत नामनिर्देशानाची सकाळी 11.00 ते दु. 3.00 वा. पर्यंतची वेळ सायं. 5.30 पर्यंत वाढविण्यात येत आहे., राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सुर्यकृष्णमूर्ती यांनी हे आदेशपत्र जारी केले आहे. ( Gram Panchayat Election News Extended time for submission of nomination papers There is an error while printing declaration )
अधिक वाचा –
– इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या सहकार्याने सोमाटणेतील जिल्हा परिषद शाळा बनली ‘हॅप्पी स्कूल’
– रस्ते, गृहनिर्माण संस्थांच्या पायाभूत सुविधांबाबत गुरुवारी महापालिकेत बैठक; खासदार श्रीरंग बारणेंची माहिती
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । कुटुंबाचा विरोध झुगारून ती बनली बस कंडक्टर; वाचा ‘डॅशिंग लेडी कंडक्टर’ रेश्मा सय्यद यांचा जीवनप्रवास