वडगाव नगरीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या संकल्पनेतून मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगांव नगरीत भव्य दिव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेचा शुभारंभ मावळ तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके तसेच पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी शोभायात्रेस भेट दिली. ( Gudhipadwa Celibration In Vadgaon Maval Citizens Participate In Parade Shobha Yatra Organized To Welcome New Year Photo )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या शोभायात्रेत प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य अशी नेत्रदीपक मूर्ती आणि आयोध्येतील मंदिराची प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. तसेच ढोल पथक, चित्ररथ, रांगोळी पायघड्या, मर्दानी खेळ दानपट्टा लाठीकाठी – आगीचे प्रात्यक्षिके, मल्लखांबावर चित्तथरारक प्रात्यक्षिके, दिंडी वारकरी पथक, भक्ती शक्ती संच, छत्रपती शिवाजी महाराज संच तसेच पारंपरिक लोककला संच, मंगळागौर, बैलगाडी, नंद ( मंगळागौर, वासुदेव, पोतराज, वाघ्या मुरुळी, नगारा, गोंधळी, कोळी नृत्य, लावणी नृत्य ) इत्यादींचा समावेश होता.
शोभायात्रेस सुरुवात होण्यापूर्वी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील बाजारपेठेतून टू व्हीलर बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष चेतना ढोरे, उपाध्यक्षा प्रतीक्षा गट आणि मोरया महिला प्रतिष्ठानच्या सर्व संचालिका, सदस्या आणि शहरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मोरया प्रतिष्ठान वडगाव मावळ यांच्या वतीने गुढीपाडवा निमित्त काल आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेमध्ये सहभागी झालो. वडगावकरांनी मोठ्या दिमाखात मराठी नववर्षाचे शानदार स्वागत केले. pic.twitter.com/xXG4YcEB9l
— Sunil Shelke (@shelkesunilanna) March 23, 2023
मोरया प्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या संकल्पनेस पाठिंबा म्हणून शहरातील साईनाथ मित्र मंडळाच्या वतीने स्वतःहून एक चित्ररथ सहभागी केला होता. यावेळी वडगाव शहरातील सर्वच गणेशोउत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शोभयत्रेस विशेष सहकार्य केले. गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभयात्रेची संकल्पना शहरातील नागरिकांना अतिशय आवडल्याने यावर्षीच्या शोभायात्रेत शहरातील विविध भागांमधील सोसायटी धारकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर होती.
उत्सव संस्कृतीचा मराठी अस्मितेचा या थीमवर शोभायत्रीचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रा मार्गावर सुबक रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. यावेळी श्री पोटोबा महाराज प्रासादिक दिंडीचे सांप्रदायिक क्षेत्रातील सर्व सभासद उपस्थित होते. तसेच तरुणांनी डीजेच्या तालावर ठेका धरत नृत्याचा मनसोक्त आनंद लुटला. शोभायात्रा मिरवणूकीची सुरुवात पंचायत समिती चौक येथून होऊन खंडोबा मंदिर चौक येथे या शोभायात्रेचा समारोप झाला.
यावेळी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, लहान मुले, महिला भगिनी मोठ्या संख्येने पारंपारिक वेशभूषेत शोभायात्रेत सहभागी झाले होते. मिरवणूकीदरम्यान संपूर्ण शहरात उत्साहाचे व आनंदाचे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गुढीपाडवा शोभायात्रेत मोरया महिला प्रतिष्ठानच्या महिला सदस्यांची उपस्थिती लक्षणीय होती. मिरवणूक सरते शेवटी नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे, तज्ञ संचालक सुभाषराव जाधव, ज्येष्ठ नेते मंगेशकाका ढोरे, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे, सामाजिक कार्यकर्ते अशोकराव ढमाले, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनीलभाऊ चव्हाण, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, युवक अध्यक्ष अतुल वायकर, ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष शांताराम कुडे, महिला अध्यक्षा पद्मावती ढोरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत, नगरसेवक राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, मंगेश खैरे, नगरसेविका पुनम जाधव, माया चव्हाण, पूजा वहिले, युवा उद्योजक सचिन कडू, वडगाव बजरंग दल अध्यक्ष अमोल पगडे, दिंडी अध्यक्ष महेंद्र ढोरे, सिद्धेश ढोरे, युवराज ढोरे, गणेश जाधव आदींसह विविध राजकीय पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वडगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– श्री पोटोबा महाराज उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी संजय दंडेल, पाहा कमिटीची संपूर्ण यादी । Vadgaon Maval
– ‘एक इशारा अन् साफ झाला माहीमचा किनारा’, राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर शिंदे सरकारची तत्काळ कारवाई, ‘ती’ मजार हटवली