तळेगाव दाभाडे शहरातील मायमर (MIMER) वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोग्य संपदा महाशिबीर’ याचे उद्घाटन रविवारी (29 जानेवारी) संपन्न झाले. विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजिन करण्यात आले. ( Health camp in Talegaon Dabhade town of Maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिनांक 30 जानेवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत या महाशिबिराचा कालावधी असणार आहे, यामध्ये मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहेत. मावळ तालुक्यातील गरजू व्यक्तींनी या शिबिरात सहभागी होऊन विविध आजारांवरील मोफत आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी केले.
यावेळी आमदार शेळके, प्राचार्य डॉ. स्वाती बेलसरे, कार्यकारी संचालक डॉ. सुचित्रा नागरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी, कार्यकारी संचालक डॉ. वीरेंद्र घैसास आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ 4 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक
– मोठी बातमी! जवण-तुंग रोडवर अपघात, थेट शेतातील विहिरीत कोसळली कार