Dainik Maval News : मागील अनेक वर्षांपासून मावळचे उपविभागीय कार्यालय बावधन येथे असून मावळ तालुक्यातील नगरिकांना सुनावणीसाठी तिथे जाणे भाग पडत होते. तालुक्यातील गावखेड्यातील नागरिकांसाठी हे गैससोयीचे ठरत होते. या संदर्भात मावळ तालुक्यातील जनतेच्या वारंवार होणाऱ्या मागणीनुसार उपविभागीय अधिकारी कार्यालयात होणारा सुनावणी बोर्ड येत्या सोमवार पासून (दि. 10 फेब्रुवारी) वडगाव मावळ तहसील कार्यालयात घेण्यात येणार असल्याची माहिती प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली.
या निर्णयामुळे मावळ तालुक्यातील नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार असल्याने मावळातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी मावळ आणि मुळशी तालुक्यासाठी पुणे येथील सेंट्रल बिल्डिंगमध्ये प्रांताधिकारी कार्यालय होते. काही वर्षांपूर्वी तत्कालीन प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी हे कार्यालय दोन्ही तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टीने बावधन येथील शासकीय प्रशिक्षण केंद्रामध्ये सुरू केले होते.
- प्रांताधिकारी नवले यांनी यापुढे मावळ तालुक्यातील प्रकरणांची सुनावणी वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात आणि मुळशी तालुक्यातील प्रकरणांची सुनावणी ही बावधन येथे घेण्याचा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी येत्या सोमवार (दि.10) पासून सुरू करण्यात येणार आहे. सोमवारी मावळ तालुक्यातील सुनावणीचा पहिला बोर्ड होणार असून यापुढे दर सोमवारी वडगाव मावळ येथेच सुनावणी होणार आहे.
तसेच, मुळशी तालुक्यातील केसेसची सुनावणी ही दर मंगळवारी बावधन येथे होणार आहे. वकीलांकडून उशीर होणाऱ्या प्रकरणांची सुनावणी दर बुधवारी बावधन येथे होणार आहे. याशिवाय बजावणी बोर्ड हळूहळू बंद करून मूळ बोर्डवर सुनावणी घेणार असल्याचेही प्रांताधिकारी नवले यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News