लोणावळा लोहमार्ग पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे एका टीईटी चे ( टीसी – तिकीट कलेक्टर) प्राण वाचले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हा प्रसंग घडला. ( Heart attack To TC On Train Journey Lonavala Railway Police Save Their Lives )
बुधवार (दिनांक 25 जानेवारी) रोजी मैसूर – अजमेर एक्सप्रेस (16210) या गाडीचे ऑन ड्युटी टीटीई (टीसी) रविकांत रामचरण भारती ( वय – 52 वर्षे) यांना पुणे ते लोणावळा दरम्यान तीव्र हृदय विकाराचा झटका आला. त्यामुळे एक्सप्रेस गाडी लोणावळा येथे पोहोचली असता पोलिस हवालदार अनिल डी. जाधव यांनी रेल्वे डॉक्टर निलेश शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई गुंजाळ यांच्यासह भारती यांना गाडीतून उतरवून घेऊन तात्काळ संजीवनी हॉस्पिटल लोणावळा येथे दाखल केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रविकांत भारती यांना रेल्वे पोलिसांनी तत्काळ आयसीयू वॉर्डात दाखल केल्याने, त्यांचे प्राण वाचले आहेत. रेल्वे डॉक्टर आणि पोलिस यांच्या प्रसंगावधानाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. तसेच भारती यांच्या कुटुंबीयांनीही त्यांचे आभार मानले.
अधिक वाचा –
– अंधाऱ्या रात्री दुचाकीसह दरीत कोसळलेल्या तरुणाला वाचवण्याचा थरार, मुंबई-पुणे महामार्गावर शिंग्रोबा मंदिराजवळील घटना
– लोणावळा परिसरात फिरायला गेलेल्या सलमान खानला लुटले; तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल