राज्यातील अनेक भागात सध्या अवकाळी पावसाचा जोर असल्याचे आपल्याला दिवस आहे. पुणे जिल्ह्यातही बऱ्याच भागात सध्या अवकाळी पावसाची दहशत पाहायला मिळत आहे. आज (दि. 16 मे) मावळ तालुक्यात अवकाळी पावसाने आपले रौद्र रूप दाखवले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सायंकाळी साडेचार वाजल्यापासून मावळ तालुक्यातील बऱ्याच भागात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन अवकाळी पाऊस कोसळू लागला. काही कालावधीतच या पावसाने रौद्र रूप धारण केल्याचे दिसून आले. ऐन पावसाळ्यातही कोसळणार नाही, असा पाऊस बरसू लागला आहे. ( Heavy unseasonal rain in Maval taluka Pune )
अवकाळी पावसात सोसाट्याचा वाराही असतो, त्यामुळे अशा वादळी वाऱ्यात नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे आवश्यकता नसेल, तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– संजोग वाघेरेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास ! बारणेंना फक्त ‘इथेच’ लीड मिळेल, पण आपला विजय ‘इतक्या’ लीडने होणार
– गुडन्यूज ! मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ महिन्यात पूर्ण होणार मिसिंग लिंक प्रकल्प
– अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना कला गौरव पुरस्कार