Dainik Maval News : वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसविणे अनिवार्य आहे. ( High Security Registration Plate )
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या नियमानुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. (Why is HSRP number plate required)
- नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहनांना बसविण्याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय मोटार नियम 1989 चे नियमानुसार सर्व वाहनांना ‘ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ‘ बसविणे बंधनकारक आहे. वाहन विक्रेत्याकडून 1 एप्रिल 2019 नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. मात्र 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार लावणे बंधनकारक केले आहे.
दर पत्रक
अन्य राज्यात जीएसटी वगळून दुचाकीचे दर प्रतिवाहन 420 ते 480 रुपये, तीन चाकी वाहन 450 ते 550, चार चाकी वाहन व जड वाहने 690 ते 800 रुपये आहेत. तर राज्यामध्ये जीएसटी वगळून दुचाकी प्रतिवाहन 450 रुपये, तीन चाकी 500, चार चाकी व जड वाहने 745 रुपये आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक