Dainik Maval News : हिंजवडीत कामावर निघालेल्या कामगारांच्या टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागून घडलेल्या घटनेत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. हा अपघात असल्याचे बोलले जात असतानाच आता तो घातपात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हिंजवडी येथे टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ही घटना अपघात नसून जाणूनबुजून रचलेला कट होता, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.20) पत्रकार परिषदेत सांगितले. जनार्दन हंबर्डीकर असे आरोपीचे नाव असून तोच टेम्पो ट्रॅव्हल्सचा चालक होता. त्याने हे कृत्य घडवून आणले असून त्याला अटक करण्यात आली आहे.
अपघात नव्हे घडवून आणलेला प्रकार
कामगारांची असलेला वाद आणि दिवाळीमध्ये मालकाने पगार कापल्याच्या रागातून बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने बस पेटवून दिल्याची घटना बुधवारी (दि.१९) हिंजवडी येथे घडली, यामध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. चालकाने कट रचून हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासामध्ये उघडकीस आले आहे.
बेंझिन केमिकलचा वापर
आरोपीने कंपनीतून आदल्या दिवशी बेंझिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले. तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही त्याने गाडीत ठेवल्या. हिंजवडी जवळ आल्यावर त्याने काडीपेटीची काडी पेटून चिंध्या पेटवल्या आणि केमिकल मुळे बसमध्ये आगीचा भडका उडाल्याचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आरोपीने ही गुन्ह्याची कबुली दिली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मोर्चेबांधणी ; 22 मार्चला सर्व उमेदवारांची बैठक
– पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर आमदार सुनिल शेळकेंनी विधानसभेत उठवला आवाज ; मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या…
– मावळ मतदारसंघातील रेल्वेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी येत्या आठ दिवसांत बैठक ; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची ग्वाही । Maval Lok Sabha