Dainik Maval News : मावळ तालुक्यातील भाजगाव येथे अज्ञात चोरट्यांनी राहत्या घराचे कुलूप तोडून घरफोडी केली. त्यात सुमारे 3 लाख 1 हजार पाचशे रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि घरगुती वस्तू चोरीस गेल्या आहेत. या प्रकरणी फिर्यादी कुसाबाई दत्तू बिनगुडे (वय 65, व्यवसाय शेती, रा. भाजगाव, ता. मावळ, जि. पुणे) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 7 मार्च 2025 रोजी सायंकाळी सात ते 13 मार्च 2025 रोजी सायंकाळी साडेसात या दरम्यान त्यांच्या राहत्या घराचा दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील लाकडी कपाट तोडून त्यामधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. हा प्रकार फिर्यादींना समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
- सोन्याचे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र, दोन तोळे वजनाचे गंठण, एक तोळे वजनाचे डोरले, अर्धा तोळे वजनाची कर्णफुले, 20 हजार रुपये रोख रक्कम, चार नेसणीच्या साड्या, एचपी कंपनीची गॅस टाकी, 32 इंची एलईडी टीव्ही, तांब्याचा बंडा आणि बिस्कीट पुड्याचे पोते असा एकूण 3,01,500 रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.
याबाबत कामशेत पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कामशेत पोलीस करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भंडारा डोंगरावरील मंदिराच्या उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
– तुकाराम..तुकाराम.. नाम घेता कापे यम । लाखो भाविकांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा संपन्न
– पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय, रिंग रोड बाबत महत्वाची माहिती ; ‘या’ 13 गावात भूसंपादनाला वेग



