Dainik Maval News : लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या आणखीन एका कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कामशेत येथे गुरुवारी (दि.30) पोलिसांनी धडक कारवाई करीत टाकलेल्या छाप्यात तब्बल 740 लीटर पेट्रोल आणि 105 लीटर रॉकेलचा साठा जप्त करण्यात आला आहे.
कामशेत येथील गदीया कॉम्प्लेक्समध्ये एका खोलीत ज्वलनशील पदार्थांचा अवैध साठा करून ठेवल्याची गोपनीय माहिती आयपीएस सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. त्यांनी या माहितीच्या आधारे छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश कामशेत पोलिसांना दिले होते. त्यानुसार गुरुवारी कामशेत पोलिसांच्या पथकानी सदर ठिकाणी छापा टाकला. तेव्हा सुभाष रतनचंद गदिया (रा. कामशेत) याने गदिया कॉम्प्लेक्समधील एका खोलीत पेट्रोल सदृश्य आणि रॉकेल सदृश्य ज्वलनशील द्रव्य पदार्थांचा अवैध साठा करून ठेवल्याचे आढळून आले.
- पोलिसांनी आठ बॅरलमधून 740 लीटर पेट्रोल आणि 105 लीटर रॉकेल चा साठा जप्त केला असून एकूण 80 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आरोपी सुभाष रतनचंद गदिया याच्यावर कामशेत पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 2023 च्या कलम 287 सह अत्यावश्यक वस्तू अधिनयम सन 1955 चे कलम 3,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक रविंद्र पाटील, पोलीस निरिक्षक दत्तात्रय शेडगे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक नितेंद्र कदम, पोलीस अंमलदार समिर करे, पोलीस कॉन्स्टेबल माळवे, गारगोटे, ठाकूर, रविंद्र राऊळ, तहसील कार्यालय वडगाव मावळ येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी तुषार तनपुरे व पुरवठा निरिक्षक संदीप तनपुरे यांच्या समक्ष करण्यात आली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता
– तळेगाव शहर हादरले ! भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची हत्या । Murder in Talegaon Dabhade City