Dainik Maval News : शोभेच्या दारू आणि फटाक्यांच्या दुकानांपासून १०० मीटर परिसरात धूम्रपानास बंदी घालण्याबाबतचे तसेच या परिसरात कोणत्याही प्रकारचे दारू काम करण्यास, फटाके उडविण्यास किंवा शोभेच्या दारूचे रॉकेट परिक्षणासाठी उडविण्यास मनाईचे आदेश मावळ-मुळशी उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र नवले यांनी सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने जारी केले आहेत.
मुंबई पोलीस कायदा १९५१ च्या नियम ३३ (१) (ओ) (यु) अन्वये जारी केलेले हे आदेश ५ ते २३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मावळ-मुळशी तालुक्यात (पोलिस आयुक्त, पुणे शहर व पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्र वगळता) लागू राहणार आहे. आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायदा १९५१ च्या कलम १३१ नुसार शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समितीवर असणार महिलाराज ; सभापतीपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव । Maval Panchayat Samiti
– लोणावळ्यात मनसैनिकांनी कसली कंबर ! नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त शक्तीप्रदर्शन, शेकडोंचा पक्षप्रवेश । Lonavala MNS
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी
