पुणे शहर आणि पिंपरी – चिंचवड शहर या दोन्ही शहरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या पुणे रिंग रोड प्रकल्पाबाबत महत्वाची अपडेट हाती आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे रिंगरोड प्रकल्प हाती घेतला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्राप्त माहितीनुसार, पुणे रिंगरोड प्रकल्पाच्या निविदा उघडण्यात आल्या आहेत, त्यात नऊ पॅकेजसाठी पाच कंपन्या पात्र ठरल्या असून निवडणूक रोखे प्रकरणात आघाडीवर असलेल्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीचा देखील यात समावेश आहे. तसेच रिंगरोडच्या कामाला प्रत्यक्षात जून महिन्यात सुरुवात होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ( important update regarding Pune Ring Road read immediately Pune RingRoad News )
- मेघा इंजिनिअरिंग, नवयुग इंजिनिअरिंग या कंपन्या नऊ पॅकेज पैकी प्रत्येकी तीन असे सहा पॅकेजमध्ये सर्वात कमी रकमेच्या निविदा भरल्या आहेत. तर उर्वरित तीन पॅकेजमध्ये पीएमसी इन्फ्रा, रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा आणि जीआर इन्फ्रा या कंपन्या पात्र ठरल्या आहेत.
एमएसआरडीसीने पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यांमध्ये पुणे रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. या रिंगरोडची लांबी 127 किलोमीटर आहे. तर रुंदी 110 मीटर आहे. दोन टप्प्यांमध्ये या रस्त्याचे काम होणार आहे. पश्चिम भागातील रिंगरोडसाठीचे सुमारे 80 टक्के भूसंपादन झाले आहे. पश्चिम भागातील रस्त्यासाठी पाच पॅकेज (टप्पे) करण्यात आले आहेत.
पूर्व भागासाठी सुमारे 70 टक्क्यांहून अधिक भूसंपादन झाले आहे. पूर्व भागातील रस्त्यासाठी चार पॅकेज (टप्पे) करण्यात आले आहेत. या रस्त्याचे काम देण्यासाठी एमएसआरडीसीने निविदा प्रक्रिया राबवली. निविदा भरण्याची अंतिम मुदत 16 एप्रिल पर्यंत होती. त्यानंतर या निविदा नुकत्याच उघडण्यात आल्या.
रिंगरोडच्या कामासाठी पात्र ठरलेल्या कंपन्यांनी दाखल केलेल्या निविदांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये निविदांची छाननी होईल. त्यामुळे जूनमध्ये रिंगरोडच्या कामाला सुरुवात होईल, असे सांगितले जात आहे.
अधिक वाचा –
– गाडी चालवता येते पण पक्के लायसन्स नाही? आरटीओकडून जून महिन्यातील वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– सर्वांनाच आतुरता निकालाची ! 2 वाजेपर्यंत समजणार मावळचा नवा खासदार, किती फेऱ्या होणार? कशी आहे व्यवस्था? वाचा सविस्तर
– महत्वाची बातमी ! तळेगावकरांची होणार गैरसोय, गुरुवारी ‘या’ ठिकाणचा पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या । Talegaon Dabhade