Dainik Maval News : मॅकवर्ड्स कंपनीच्या सीएसार फंडातून शिवणे (ता. मावळ) येथील श्री संत तुकाराम विद्यालयासाठी दोन वर्गखोल्या मिळालेल्या आहेत. या वर्गखोल्यांचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, श्री संत तुकाराम विद्यालय शालेय समितीचे अध्यक्ष संदीप काकडे, युवराज काकडे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे माजी अध्यक्ष कमलेश कारले, श्रीशैल मेहंते, दीपक शहा, विलास जाधव, भालचंद्र लेले, विकास उभे, संजय साने, मॅनेजर विशाल नार्वेकर, हेमंत काळे, विनिता लास्कर, अनिकेत भोसले, मॅकवर्ड्स कंपनीचे पदाधिकारी तसेच माजी सभापती एकनाथ टिळे, माजी जिल्हा परिषद सदस्य भरत शिंदे, माजी सरपंच विलास टिळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना रामदास काकडे म्हणाले की, शिक्षण हा समाजाच्या विकासाचा पाया आहे, हे लक्षात घेऊन मॅकवर्ड्स कंपनीने ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधांसाठी हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळवण्याची संधी मिळणार आहे.
यावेळी कमलेश कारले म्हणाले की, या वर्गखोल्या म्हणजे केवळ इमारती नाहीत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आशा, संधी आणि भविष्य घडवण्याचे प्रतीक आहेत. विशाल नार्वेकर म्हणाले की, हा उपक्रम फोसेकोच्या शैक्षणिक विकासाला मॅकवर्डस कंपनीचा CSR मोहिमेचा एक भाग असून, शिक्षणात प्रवेश आणि गुणवत्ता वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र शेळके यांनी केले. सूत्रसंचालन रामदास टिळे यांनी, आभार प्रदर्शन संदीप काकडे यांनी मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मंत्री भेट देणार म्हणून एक दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका ; लोणावळा भेटीत परिवहन मंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान । Lonavala News
– मावळच्या राजकारणातील सर्वात मोठे पक्षांतर ! काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांना खिंडार ; बापूसाहेब भेगडे यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश
– मोठी बातमी ! शिवसेना जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, तर मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती । Maval Taluka Shiv Sena