व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन । DCM Ajit Pawar

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन, लोकार्पण बुधवारी (दि.9) करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 10, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Bhoomi Pujan in Pimpri Chinchwad by DCM Ajit Pawar

Photo Courtesy : FB / Ajit Pawar


Dainik Maval News : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन, लोकार्पण बुधवारी (दि.9) करण्यात आले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार श्रीमती उमा खापरे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, श्रीमती अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर आदी उपस्थित होते.

उद्घाटन कार्यक्रमांतर्गत बोपखेल येथे मुळा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे पुस्तकाचे प्रकाशन व नवीन वाहनांचे उद्घाटन, निगडी येथे इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचे (आयसीसीसी) लोकार्पण, गणेश तलाव जवळ हरीत सेतू विषयक कामाचा भूमिपूजन समारंभ, पवना नदीवर पिंपरी ते पिंपळे सौदागर दरम्यान बांधलेल्या पुलाचे लोकार्पण, सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावर सब-वे बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ, मुळा नदीकाठ सुधारणा प्रकल्प पुणे महानगरपालिका यांच्यासोबत राबविण्याच्या कामाच्या टप्पा १ चा शुभारंभ, मुळा नदीवर सांगवी-बोपोडी दरम्यान बांधलेल्या पुलाचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

बोपखेल येथे मुळा नदीवरील पूल –
बोपखेल येथे मुळा नदीवर १.८५६ कि.मी. लांबीच्या पुलाचे बांधकाम करण्यात आले असून त्यासाठी ५३ कोटी ५३ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. बोपखेल येथील नागरिकांना पिंपरी चिंचवड शहराकडे ये जा करण्यासाठी भोसरी किंवा विश्रांतवाडी- खडकी मार्गावरून सुमारे १० ते १५ कि.मी. अंतराचा वळसा घालावा लागत होता. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. आता या पुलामुळे नागरिकांना २.९ कि.मी. अंतरावर खडकी कॅन्टोन्मेंट भागातून पिंपरी व पुणे शहराकडे ये जा करता येणार आहे.

इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची (आयसीसीसी) शहरावर नजर –
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि.च्यावतीने इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) उभारण्यात आले आहे. यामध्ये शहरातील सुमारे ३ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची या केंद्राशी जोडणी करण्यात आली आहे. या सेंटरच्या माध्यमातून शहरातील रस्ते, महत्त्वाचे चौक, विविध महत्त्वाच्या तसेच गर्दीच्या ठिकाणांवर २४ बाय ७ लक्ष ठेवण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कोठे काही अनुचित प्रकार घडत असल्यास, वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निर्देशनास आल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही करणे शक्य होणार आहे. याशिवाय शहरातील कचरा उचलणाऱ्या सर्व वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविलेली असून या वाहनांचे संनियंत्रणही या कमांड सेंटरच्या माध्यमातून केले जाणार आहे.

पवना नदीवर पिंपरी ते पिंपळे सौदागर दरम्यान बांधलेल्या पुलामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. मुळा नदीवर सांगवी-बोपोडी दरम्यान बांधलेल्या पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासह गतीमान होणार आहे. मुळा नदीकाठ सुधारणा प्रकल्प पुणे महानगरपालिका यांचे सोबत राबविण्याच्या कामाच्या टप्पा १ चा शुभारंभ करण्यात आला असून त्यामुळे नदीच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वंदन दुर्गांना । वडीलांना आदर्श मानून ‘ती’ डॉक्टर झाली ; जिद्दीने निखिलेशाताईंनी स्वतःचं नवं अस्तित्व बनवलंय । Dr Nikhilesha Shete
– भारताचा कोहिनूर हरपला ! प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास । Industrialist Ratan Tata Dies
– मोठी बातमी ! इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी 30 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन


Previous Post

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ४६ हजार विद्यार्थ्यांना ४२ कोटी रूपये विद्यावेतन, थेट खात्यात पैसे जमा

Next Post

वंदन दुर्गांना । पतीच्या निधनानं ती कोसळली, मात्र संगीताने जगण्याचं बळ दिलं ; गायन हाच श्वास समजून आयुष्य जगणाऱ्या मंजुश्रीताई

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Singer Manjushree Diwan Pune

वंदन दुर्गांना । पतीच्या निधनानं ती कोसळली, मात्र संगीताने जगण्याचं बळ दिलं ; गायन हाच श्वास समजून आयुष्य जगणाऱ्या मंजुश्रीताई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.