चिखली येथील 100 एमएलडी क्षमतेच्या जलशुध्दीकरण प्रकल्पाचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (दिनांक 16 मे) उद्घाटन करण्यात आले. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ( Pimpri Chinchwad News ) माध्यमातून हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात आला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, विभागीय आयुक्त सौरव राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन –
देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्यात पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन देखील करण्यात आले. याप्रसंगी चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, विभागीय आयुक्त सौरव राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी ‘श्री मृत्युंजय रक्तसंकलन महामेळावा’, देवदर्शन यात्रा समितीचा स्तुत्य उपक्रम
– वडगाव नगरपंचायतीकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे-नाले सफाईचे काम सुरु