Dainik Maval News : राज्यातील ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय सोमवारी (दि.30 सप्टेंबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
ग्रामपातळीवर ज्या ग्रामरोजगार सेवकांनी दोन हजार पेक्षा जास्त दिवस काम पूर्ण केले आहेत. त्यांना मजुरी खर्चाच्या एक टक्के प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल. दोन हजार दिवसांपर्यंत काम केलेल्या ग्रामरोजगार सेवकांना दर महिना एक हजार रूपये व दोन हजार एक दिवसांपेक्षा जास्त दिवस काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना दरमहा दोन हजार रुपये प्रवास भत्ता व डेटा पॅक करिता अनुदान देण्यात येईल.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शहरातील रस्त्यांची दुरवस्था कायम, खासदार श्रीरंग बारणे अधिकाऱ्यांवर संतापले ; पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश
– ब्रेकिंग : हिंजवडी – बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळले, तीन जणांचा मृत्यू । Helicopter Crashed At Bawdhan
– मावळ तालुक्यात यावर्षी विक्रमी भातपीक, चांगले उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना आशा । Maval News