Dainik Maval News : आयएनएस शिवाजी व लोणावळा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.14) नौदल दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या पुरंदरे मैदानावर शनिवारी सायंकाळी कार्यक्रम होणार आहे. यावेळी विशेष इंडियन नेव्ही बँड कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला आयएनएस शिवाजीचे स्टेशन कमांडर समीर चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय लष्कर व नौदलाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांनी लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने सर्व नागरिक, नगरपरिषद सदस्य, संरक्षण दलाचे माजी अधिकारी, पालक आणि विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सर्वांनी कार्यक्रमात सहभागी होऊन संरक्षण दलाचा सन्मान करावा आणि या प्रेरणादायी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोणावळा नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके इन ‘अॅक्शन मोड’ ! मावळ मतदारसंघातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची घेतली संयुक्त बैठक
– जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करा ; आमदार शेळकेंची अधिकारी व ठेकेदारांना तंबी
– गांजा बाळगल्याप्रकरणी तरूणाला अटक, गहुंजे हद्दीत पोलिसांची कारवाई, 20 लाखाचा मुद्देमाल जप्त । Maval Crime