मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या होर्डींग दुर्घटनेनंतर राज्यभरातील स्थानिक प्रशासकीय यंत्रणा जागृत झाल्या आहेत. हद्दीतील होर्डींगची तपासणी करून संबंधितांना सुचना केल्या जात आहेत. तसेच राजकीय पक्षांकडूनही होर्डींग बाबत दक्षता घेण्याचा सुचना केल्या जात आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
त्याच पार्श्वभूमीवर देहू नगरपंचायतीच्या हद्दीत असलेले अनधिकृत होर्डिंग्ज 24 तासात काढून घेण्याची नोटीस संबंधितांना देहू नगरपंचायत प्रशासनाने दिल्या आहेत. एकूण नऊ जणांचा यात समावेश आहे. ( Instructions to remove unauthorized hoardings in Dehu Nagar Panchayat limits within 24 hours )
देहूत दररोज भाविक येत आहेत. तसेच जून महिन्यात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा असून सोहळ्यानिमित्त भाविकांची गर्दी होणार आहे. त्यातच पावसाळा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी होर्डिंग्ज काढण्याचे आदेश दिले आहेत.
अधिक वाचा –
– वाचकांच्या प्रतिक्रिया : ‘सुधारणा हवी पण नियोजनबद्ध काम व्हावे.. तळेगाव स्टेशन येथील राडारोडा रेल्वे प्रवाशांसाठी ठरतोय घातक’
– बेगडेवाडी स्थानकावर रेल्वेतून उडी मारून आरोपी पसार, पोलिसांकडून शोधाशोध सुरु । Talegaon Dabhade
– पुणे विभागीय भरारी पथकाकडून परदेशी बनावटीच्या मद्यासह 11 लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त । Pune Crime