Dainik Maval News : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ठाकुरसाई (ता. मावळ) येथे गावातील महिला भगिनींसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तीस वर्षांवरील महिलांची मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात आली. तसेच आरोग्यविषयी मार्गदर्शन करण्यात आले. गावातील महिला वर्गाचा शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.
प्राथमिक आरोग्य केंद्र येळसे येथील डॉ विजय वाळेकर, अंगणवाडी सेविका संगिता कालेकर, ग्रामविकास अधिकारी नंदा बाबर, आशासेविका वैशाली पवार, निर्मला शिंदे, स्वाती मोहोळ यांच्या पुढाकारातून हे शिबिर संंपन्न झाले.
बदलत्या जीवनशैली मुळे होणारे विविध आजार लक्षात घेता, जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल करून ते आजार आटोक्यात आणले जाऊ शकतात, असे मार्गदर्शन डॉक्टरांनी केले. तसेच निरोगी आयुष्यमान हवे असल्यास नियमित योगा करणे गरजे असल्याचे सांगितले. यासह महिलांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग याविषयी जनजागृती करण्यात आली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जागतिक महिला दिन : अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार ; योजना बंद होणार नाही – मुख्यमंत्री
– पवना धरण जलाशयाच्या प्रतिबंधित क्षेत्रात अतिक्रमणे ; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची कबुली । Maval News
– चिमुकलीपाठोपाठ आईनेही घेतला जगाचा निरोप ! 46 दिवस मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज अयशस्वी । Pune News