Dainik Maval News : लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी कर्तव्यावर पुन्हा रुजू होताच कारवाईची मालिका सुरु केली आहे. शुक्रवारी (दि.10) लोणावळा उपविभागात मध्यरात्री केलेल्या कारवाईत कामशेत येथील दीपा बार अँड रेस्टॉरंट आणि वडगाव मावळ मधील फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट अशा दोन ठिकाणी धडक कारवाई केली.
याठिकाणी पोलीस पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये वरील बार रेस्टॉरंट चालक हे विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी त्यांचे बारमध्ये ग्राहकांना खाद्यपदार्थ, दारू ई.ची विक्री करताना तसेच वाद्य,ऑर्केस्ट्रा चालू ठेवलेला असताना मिळुन आले. त्यामुळे नमूद दोन्ही बार चालकांवर भारतीय न्याय संहिता चे कलम २२३ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम ३३(डब्ल्यू) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
पुढील तपास कामशेत पोलीस स्टेश वन वडगाव मावळ पोलीस स्टेशन हे करीत आहेत. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे पथकासह केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– निर्णयाचे ढोल वाजविले… आता पुढे काय ? पुणे – लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्र्रॅकचे काम अद्यापही फायलीत अडकले
– महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’ , गतीमान कारभारासाठी मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय, जाणून घ्या अधिक
– पाणी पुरवठा योजनांची कामे ठरविलेल्या मुदतेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई होणार