वडगाव मावळ : नगरपंचायत स्थापन झाल्यापासून वडगाव शहर अधिक वेगाने विस्तारत आहे. वडगाव शहराची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे. अशात वाढती लोकसंख्या आणि नागरिकरण लक्षात घेता नागरिक, महिला, विद्यार्थी, कामगार, जेष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य जनतेची होणारी अडचण लक्षात घेवून त्यांचा प्रवास अधिक सोपा व्हावा, या हेतूने वडगाव शहरातील खंडोबा चौक इथे जय मल्हार ऑटो रिक्षा संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. ( Jai Malhar Auto Rickshaw Association inaugurated by MLA Sunil Shelke Vadgaon Maval )
सदर संघटनेच्या नामफलकाचे उद्घाटन मावळचे आमदार सुनिल शेळके ह्यांच्या हस्ते आज (बुधवार, दिनांक 23 ऑगस्ट) रोजी करण्यात आले. यावेळी वडगाव नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष मयुर ढोरे, माजी नगरसेवक राजेंद्र कुडे, माजी मंगेश खैरे, माजी नगरसेविका पुजा वहिले, राष्ट्रवादी काँग्रेस वडगाव शहर अध्यक्ष प्रविण ढोरे, तुषार वहिले, अफताब सय्यद, शैलेश वहिले, सौरभ सावले, संतोष देशमुख, आप्पा तुमकर आदी उपस्थित होते.
जय मल्हार ऑटो रिक्षा संघटनेचे संस्थापक माजी उपसरपंच विशाल वहिले हे असून अध्यक्ष योगेश भोकरे आहेत. विनायक लंके, संतोष धोंगडे, प्रदीप जोगदंड, ओंकार धोंगडे, किरण गावडे, अमोल पवार, कैलास फाटक, पांडुरंग कचरे हे सभासद आहे. नामफलकाच्या अनावरणानंतर उपस्थित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुनिल शेळके यांचा सन्मान केला. ( Jai Malhar Auto Rickshaw Association inaugurated by MLA Sunil Shelke Vadgaon Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– देशात सध्या खतांचा 150 लाख टन साठा, खरीप हंगामासह आगामी रब्बी हंगामासाठीही खत साठा उपलब्ध
– ‘संकल्प नशामुक्ती अभियान’ – मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्या 8 नशेखोरांवर लोणावळा शहर पोलिसांची कारवाई । Lonavala Crime
– ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले आणि काही तासात नवीन शिक्षक रुजू झाले; शिळींब गावातील हटके आंदोलनाची जिल्ह्यात चर्चा