पवना मेडिकल फाऊंडेशन आणि इनरव्हील क्लब तळेगांव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने इनरव्हील क्लब मेंबर्ससाठी जीवन रक्षक अभियान राबविले गेले. जीवनदान हे सर्वश्रेष्ठ आहे. इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडेच्या क्लब हाऊस मध्ये पवना मेडिकल फाऊंडेशनच्या अध्यक्ष डॉ वर्षा वाढोकर यांनी हा उपक्रम राबविला. वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्याचे प्राण वाचविण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने नेमके कसे आणि कोणते प्रथमोपचार करायचे, याचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक डॉ. अनुपमा, डॉ. नीलम आणि डॉ प्रचिती यांच्याकडून करण्यात आले.
श्वानदंश, सर्प दंश झाल्यावर रुग्णाला तातडीने हॉस्पिटल मध्ये नेण्यापूर्वी दिलासा देऊन त्याची हालचाल कमी होईल याकडे लक्ष द्यावे, जेणेकरून त्याचे रक्ताभिसरण सामान्य राहील. घशात काही अडकल्याने श्वास गुदमरला जात असताना जर ती सर्वसामान्य व्यक्ती किंवा गर्भवती महिला वा बालकांना कसे जपावे, शास्त्रीय पद्धतीने त्यांचे प्राण कसे वाचवावे याचे वेगवेगळे प्रात्यक्षिक करून दाखवले. ( Jeevan Rakshak Abhiyan through Inner wheel club and Pavana Medical Foundation )
सध्या हृदयरोगाचे प्रमाण फार वाढले आहे. एखाद्या व्यक्तीला अचानक हार्ट अटॅक, कार्डिअॅक अरेस्टचा त्रास जाणवला तर CPR ट्रीटमेंट कशी द्यावी, जेणेकरून रुग्णाच्या हृदय आणि फुफुस यांचे पुनरुत्थान करता येईल आणि रुग्णालयात नेण्यापूर्वी त्याचे प्राण वाचतील याचे मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित महिला सभासदांकडून याचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.
अभ्यासाअंती असे लक्षात आले आहे की CPR दिल्याने रुग्णाचा प्राण वाचू शकतात. खूप कमी जणांना CPR देता येतो. याबद्दल अनेक रहिवासी सोसायट्यांमध्येही पवना मेडिकल फाऊंडेशनने जनजागृती करायचे ठरवले आहे, असे प्रतिपादन डॉ वर्षा वाढोकर यांनी केले. 50 सभासदांनी या जीवन रक्षक प्रणाली ट्रेनिंगचा लाभ घेतला. क्लबच्या अध्यक्षा संध्या थोरात, सेक्रेटरी निशा पवार, ट्रेझरर भाग्यश्री काळेबाग, आयएसओ वैभवी पवार यावेळी उपस्थित होत्या. संध्या थोरात यांनी डॉ वर्षा वाढोकर त्यांच्या सहकारी आणि पवना मेडिकल फाऊंडेशन यांनी प्रात्यक्षिकासह दिलेल्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. ( Jeevan Rakshak Abhiyan through Inner wheel club and Pavana Medical Foundation )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– चैतन्य इंटरनॅशनल स्कूल इंदुरी येथील विद्यार्थ्यांनी लोकनृत्यातून घडवले वैभवशाली भारतीय संस्कृतीचे दर्शन
– इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी संध्या थोरात; सोमाटणे इथे पार पडला पदग्रहण सोहळा । Talegaon Dabhade
– रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थिनींना डॉ. विनया केसकर यांचे अनमोल मार्गदर्शन